रुईखेडा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
रुईखेडा, ता.मुक्ताईनगर (15 ऑगस्ट 2025) : रुईखेडा गावातील मंजाबाई महादु नारखेडे विद्यालयात विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेच्या अनुषंगाने एक विशेष मार्गदर्शन सत्र व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य समन्वयक संदीप पाटील (रावेर) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
संदीप पाटील यांचा परिचय विज्ञान शिक्षिका योगीता झांबरे यांनी दिला.
संदीप पाटील सरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे महत्त्व आणि विज्ञानातील सृजनशीलता वाढविण्यास कशी मदत करते याबद्दल जिवंत उदाहरणांसह प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.

डब्ल्यूएमटू परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये भारतीय ज्ञान प्रणालीविषयी सखोल माहिती व ज्ञान निर्माण करते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.जे पाटील यांच्याहस्ते संदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गणिती राखी व वैज्ञानिक राखी या सर्जनशील उपक्रमांच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. उपस्थितांचे आभार संदीप चौधरी यांनी मानले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक आर.वाय.सोनवणे, शशिकांत सोनवणे, बबीता तडवी, संदीप चौधरी, कृष्णा भंगाळे, साखरे उपस्थित होते.




