रावेरातील महाजन आय.टी.आय.मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात
रावेर (16 ऑगस्ट 2025) : राष्ट्रभक्तीचा जोश, तिरंग्याची शान आणि देशप्रेमाच्या घोषणा देत रावेरातील महाजन आय.टी.आय.मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. संस्थेचे प्राचार्य अशरफ तडवी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताच्या गजरात तिरंगा फडकताच उपस्थितांनी देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून टाकले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली तर प्राचार्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून देणारे प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागर चौधरी, सागर वाघोदे,कृष्णा पाटील, गणेश महाजन, तुषार पाटील, शिपाई सागर भाऊ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व निदेशक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





