भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालय 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात
भुसावळ (16 ऑगस्ट 2025) : शहरातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर संस्था असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण संस्थेच्या चिटणीस उषा पाटील यांच्याहस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सोनु मांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, झेंडा गीत, समूह गीत बँडच्या तालावर सादर करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींनी विविध मनोरे व कवायत सादर केल्या. नंतर सर्व विद्यार्थिनींनी, पालकांनी शिक्षकांनी तंबाखूमुक्त अभियानाची शपथ घेतली. त्यानंतर भारत माता की जय, वंदे मातरम ,स्वातंत्र्य दिन चिरायू हो वो आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ध्वजारोहण समारंभास मोठ्या संख्येने विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.




