भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात
Dahi Handi is a celebration at The World School in Bhusawal भुसावळ (16 ऑगस्ट 2025) शहरातील कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित ‘द वर्ल्ड स्कूल’ भुसावळमध्ये श्रीकृष्ण जन्मानिमित्त शनिवारी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या व राधेच्या विविध वेशभूषा साकारत विविध प्रकारच्या गाण्यांवर नृत्य सादर करीत लक्ष वेधले.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व बाल गोपालांना श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले





