जळगाव जिल्ह्यात 16 पालिकांसह दोन नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरूवात
पहिल्या दोन तासात संथगतीने मतदान : दुपारनंतर गर्दी वाढण्याची शक्यता
Voting begins for 16 municipalities and two Nagar Panchayats in Jalgaon district जळगाव (2 डिसेंबर 2025) : जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिकासंह दोन नगरपंचायतींसाठी मंगळवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी साडेवात वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या दोन तासात संथगतीने मतदानाला सुरूवात झाली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या नशिबाचा फैसला बुधवार, 3 रोजी निकालाअंती समोर येणार आहे.
या पालिकांमध्ये मतदान
जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह, वरणगाव, सावदा, यावल, फैजपूर, रावेर, चोपडा, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर आणि चोपडा या 16 नगरपालिकांसह मुक्ताईनगर आणि नशिराबाद या दोन नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. जामनेरमधील नगराध्यक्षपदाची निवड ही आधीच बिनविरोध झाल्याने उर्वरत 17 लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी निवडणूक घेण्यात होत आहे.



प्रशासनाकडून चोख व्यवस्था
मंगळवारी सकाळी साडेसात वाजेपासून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकतेने पार पाडण्यात यावी व मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.






