21 डिसेंबरच्या मतमोजणीच्या निर्णयाला सर्वोच्च आव्हान : आजच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष


Supreme Court challenges decision to count votes on December 21 : State’s focus on today’s hearing मुंबई (5 डिसेंबर 2025) : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने मतमोजणी लांबणीवर पडली असून 21 डिसेंबर रोजी राज्यात आता मतमोजणी होणार असल्याने या आदेशाला आव्हान देणारी याचिका आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर शुक्रवार, 5 रोजी सुनावणी होत आहे. या सुनावणी न्यायालय काय निर्णय देते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने मतमोजणी लांबली
राज्यातील सर्व 288 नगरपालिका व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 2 डिसेंबरला दिला. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही 20 डिसेंबर रोजी मतदान संपल्याच्या पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे. राज्यातील 264 नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान झाले. या ठिकाणी 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती मात्र सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपालिका व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होईल. या सर्व ठिकाणी 21 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.



एकाच दिवशी 21 ला जाहीर होणार निकाल
न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील काही नगरपालिका व नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया आयोगाने पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार असल्याने सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 तारखेला मतदान होणार्‍या निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च सुनावणीकडे लक्ष
याचिकाकर्ते राजकिरण बर्वे आणि कारंजा येथील ‘एआयएमआयएम’चे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांनी संयुक्तरित्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेत तत्काळ मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. शुक्रवार, 5 रोजी ही सुनावणी होणार असल्याने याकडे लक्ष लागले आहे.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !