मध्य रेल्वेच्या 15 गाड्यांमध्ये उद्यापासून तत्काळ तिकिट बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली लागू


भुसावळ (5 डिसेंबर 2025)  : तत्काळ तिकिट बुकिंगमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ओटीपी-आधारित नवी प्रमाणित प्रणाली लागू केली आहे. शनिवार, 6 डिसेंबरपासून मध्य रेल्वेतून सुटणार्‍या 15 प्रमुख गाड्यांमध्ये तात्काळ तिकिटे जारी करताना प्रवाशांना त्यांच्या नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेल्या वन टाइम पासवर्ड (ओटीपी) ची पडताळणी अनिवार्य आहे, त्याच वेळी त्यांना तिकीट मिळणार आहे.

प्रत्यक्ष प्रवाशांनाच लाभ मिळण्यासाठी उपाययोजना
ही नवी व्यवस्था संगणकीकृत पीआरएस काउंटर, अधिकृत एजंट तसेच आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार्‍या सर्व तत्काळ बुकिंगवर लागू राहणार आहे. ओटीपी पडताळणी यशस्वी झाल्यानंतरच तत्काळ तिकीट प्रवाशांना मिळणार आहे, या उपाययोजनेचा उद्देश तत्काळ कोट्याचा लाभ प्रत्यक्ष प्रवाशांनाच मिळावा आणि अनधिकृत बुकिंगवर प्रभावी नियंत्रण ठेवणे हा आहे.



या गाड्यांमध्ये ओटीपी पडताळणीनंतर तिकीट
लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस (12219), पुणे-हावडा दुरांतो एक्सप्रेस (12221), लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस (12223), छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा दुरांतो एक्सप्रेस (12261),पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस (12263),छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर दुरांतो एक्सप्रेस (12289), नागपूर-छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस (12290), लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज दुरांतो एक्सप्रेस (12293), पुणे-अहमदाबाद दुरांतो एक्सप्रेस (12298), नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस (20101), पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस (20670), छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (20673), पुणे-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस (20674), पुणे-हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस (12025), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (22221) ही व्यवस्था 6 डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !