जळगावातील तरुणाचा खून : पसार आरोपींना अटकेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन
जळगाव (5 डिसेंबर 2025) : जळगाव शहरातील तरुण तुषार तायडेचा यावल तालुक्यात खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार असलेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याकडे करण्यात आली.
तर तीव्र आंदोलन
जळगावातील तरुण तुषार चंद्रकांत तापडे (18, समता नगर, जळगाव) याचा यावल-बोरावल दरम्यान अमानुषपणे लाथा, बुक्के व काठ्यांनी मारहाण करून खून करण्यात आला. पोलिसांनी पाच संशयीतांना अटक केली असून एक संशयीत अद्यापही पसार असल्याने त्यास अटकेची मागणी करण्यात आली तसेच या घटनेमागील मुख्य सूत्रधार याचा सुद्धा शोध लावून त्याला सुद्धा अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागणीची दखल न घेतल्यास रिपब्लिकन सेना जळगाव जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.









