भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्कॉफ कमेटीतर्फे शालेय तपासणी


भुसावळ (6 डिसेंबर 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात स्कॉफ (SQAAF) कमिटीच्या मार्फत शालेय इन्स्पेक्शन करण्यात आले. या कमिटीच्या अंतर्गत राजेश पाटील, कमिटी प्रमुख व पंचायत समिती भुसावळचे केंद्रप्रमुख मेघ:शाम सपकाळे, पिंप्रीसेकम मुख्याध्यापक रवींद्र मसाणे, कन्हाळ्याचे मुख्याध्यापक मनोज झाडे यांच्या समितीने विद्यालयात येऊन विद्यालयाने केलेल्या अंतर्गत मूल्यमापनाचे बाह्य मूल्यमापन अत्यंत निरपेक्षवृत्तीने व प्रामाणिकपणे पूर्ण केले.

या बाबींचे सखोल निरीक्षण
प्रामुख्याने ग्रंथालय, लिपिक कार्यालय, संगणक लॅब, सायन्स लॅब, आय.टी.लॅब, मुख्याध्यापक कार्यालय, स्पोर्ट्स रुम, संगीत कक्ष, स्वच्छतागृहे आदी बाबींचे त्यांनी सखोल निरीक्षण आणि परीक्षण केले. याप्रसंगी ग्रंथालयासंदर्भात विनोद भंगाळे, स्पोर्ट्स रूम संदर्भात मनोज तडवी व किरण पारधी, सायन्स लॅब संदर्भात पंकज गाजरे, संगीत कक्षा संदर्भात दिनकर हेलोडे व मनोज कुलकर्णी यांनी माहिती दिली. याप्रसंगी संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, सुनील पाठक, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, विद्यालयातील स्कॉफचे प्रमुख बी.बी.जोगी, एस.एम.चिपळोणकर, सुरेश कापसे, शैलेंद्र महाजन, शैलेंद्र वासकर, महेश सुरवाडे, कांचन राणे आदींनी समिती सोबत विविध विषयांवर विस्तृतपणे चर्चा केली.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !