भुसावळातील ताप्ती स्कूलच्या शिक्षिका पूनम फलक यांना मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज ‘नारी रत्न पुरस्कार’ प्रदान


भुसावळ (9 डिसेंबर 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका तसेच समाजसेवी व विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व सौ.पूनम विजय फालक यांना नुकताच इचलकरंजी येथे मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज नारी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, प्राचार्य डॉ.त्रिशला कदम, अक्षरा कांबळे, अरुण रंजना कांबळे, संतोष निकम, प्रमोद अंदुरकर, स्वप्निल गोरंबेकर, तेजस्विनी राजपूत यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

पुरस्काराने वाढले बळ
अरुण रंजना कांबळे संकल्पना प्रमुख यांनी पूनम विजय फालक यांच्या आजवरच्या कार्यावर प्रकाश झोत टाकला तसेच त्यांना नुकताच आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सुद्धा सर्व सभागृह समक्ष त्यांचे अभिनंदन केले. नारीरत्न पुरस्कार घेत असताना पुनम फालक यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. इचलकरंजी येथे हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासमवेत स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन कांचन जगन्नाथ नेमाडे उपस्थित होत्या.



पूनम पालक यांनी हा पुरस्कार माझ्या स्वतःचा नसून, माझ्यावर प्रेम करणार्‍या असंख्य मित्र मैत्रिणी, परिवार व विद्यार्थ्यांचा आहे व त्यांना मी समर्पित करीत आहे. पूनम फालक यांनी आजतागायत आपल्या सोळा वर्षाच्या कारकीर्दित हजारो विद्यार्थी घडवली असून ते आज उच्च पदावर कार्यरत आहेत. हा त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान आहे.

फालक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
या पुरस्कार प्राप्त कर्तुत्वाचा ताप्ती पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, महेश फालक, विष्णू चौधरी, संजय नाहाटा व सर्व पदाधिकारी, नाहाटा कॉलेजचे प्राचार्य प्रा.बी.एच.बर्‍हाटे, भोळे कॉलेजचे प्राचार्य डाँ.आर.पी फालक ,नगरसेवक पिंटु कोठारी,माधुरी फालक, उल्हासनगर येथील कांचन नेमाडे, जगन्नाथ नेमाडे, मनोज पाटील, दिनेश पाटील, तापी पब्लिक स्कूलच्या प्राचार्यां निना कटलर, उप प्राचार्या पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच भुसावळ व कुर्‍हेपानाचे येथील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. पूुनम फालक यांचे यजमान विजय फालक, सुपुत्र जय फालक, सुपुत्री लावण्या फालक यांनी सुद्धा आपल्या परिवारात प्राप्त या मानाच्या तुर्‍यास अभिवादन केले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !