भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्नेहसंमेलनात उधळले विद्यार्थ्यांनी कलागुणांचे रंग
भुसावळ (10 डिसेंबर 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार, 9 डिसेंबर रोजी सकाळ व दुपार दोन्ही शाखांचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात झाले. समारंभाची सुरुवात प्रथम सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील व दुसर्या सत्रात संस्था सदस्य विकास पाचपांडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती माता, संस्थेचे आद्य संस्थापक कै. बाबासाहेब के.नारखेडे आणि संस्थेचे माजी अध्यक्ष कै. दादासाहेब एन.के.नारखेडे यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच नटराज मूर्ती पूजनाने झाली.
विद्याथ्यार्ंंनी केली कलागुणांची उधळण
दोन्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीस सादर केलेल्या श्री. गणेश वंदनेने समारंभास शुभ संकेत दिला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्हीही सत्रातील कार्यक्रम अतिशय दर्जेदार व रंगतदार झाला त्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध नृत्य, गीत गायन, तबला/ हार्मोनियम वादन, नाटिका सादरीकरण इत्यादींनी सांस्कृतिक कार्यक्रमास बहार आणला. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे तसेच सर्व संस्था श्रेष्ठींनी विशेष शुभेच्छा दिल्या.



यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी मनीषा सोनवणे, सोनु तायडे, एस.एस.तळेले, सीमा सपकाळे, लीना चौधरी, म्युझिक सिस्टीम व्यवस्था बघणारे मनोज तडवी, एम.के.सुरवाडे, आसीफ तडवी, डी.एम.हेलोडे, प्रमुख व्ही.जी.सोनवणे तर दुपार शाखेला सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रतिभा पाटील, एस.टी.चौधरी, नितीन पाटील, एम.व्ही.कुलकर्णी, रीता महाजन, एन.जे.खाचणे, स्वाती ईखे आदींसह विद्यालयातील सकाळ व दुपार शाखेच्या संगणक विभागासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. दोन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनीच कार्यक्रम सूत्रबद्ध केला.त्यात सकाळ शाखेचा कार्यक्रम गुंजन, नियती, मिताली, कृष्णा, अमर, निमिश तर दुपार शाखेचा कार्यक्रम जान्हवी पाटील, लावण्या निकम, मनीष मावळे आणि तिलक महाजन यांनी अतिशय सुंदररित्या कार्यक्रम सूत्रबद्ध केला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल. राणे, एस. पी. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.







