भुसावळात ‘तुतारी’च्या माघारीने पुन्हा उमलले ‘कमळ’ ; परीक्षीत बर्‍हाटे बिनविरोध


भुसावळ (10 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिकेत भाजपाची विजयी घौडदौड कायम असून आतापर्यंत तीन नगरसेवक बिनविरोध झाले असताना आता तीन प्रभागासाठी होत असलेल्या निवडणुकीतही प्रभाग पाच ब मधून परीक्षीत पुंडलिक बर्‍हाटे बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक (आऊं) पितांबर चौधरी यांनी बर्‍हाटे यांच्यासाठी खास माघार घेतली आहे.

उमेदवाराची माघार अन बर्‍हाटे बिनविरोध
भुसावळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या असून प्रभाग क्रमांक पाच ‘ब’ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परीक्षित पुंडलिक बर्‍हाटे यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व माजी आमदार संतोष चौधरी यांचे खास असलेल्या अशोक पितांबर चौधरी यांनी माघारीच्या अखेरच्या दिवशी बुधवार, 10 रोजी माघार घेतल्याने व रिंगणात उमेदवार नसल्याने परीक्षीत बर्‍हाटे या प्रभागातून बिनविरोध झाले आहेत तर अधिकृतरित्या घोषणा 23 रोजीच्या निकालातून होणार आहे.



यापूर्वी तीन उमेदवार बिनविरोध
यापूर्वी प्रभाग क्रमांक 8 मधून मुकेश पाटील, प्रभाग क्रमांक 21 मधून निर्मल उर्फ पिंटू कोठारी तसेच प्रभाग क्रमांक 23 ‘अ’ मधून महिमा अजय नागराणी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

माजी आमदार समर्थक चौधरींची माघारी चर्चेचा विषय
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असलेले अशोक पितांबर चौधरी हे माजी आमदार संतोष चौधरी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी यापूर्वी प्रभाग क्रमांक 21 मधून माघार घेतल्याने तेथे पिंटू कोठारी बिनविरोध निवडून आले तर याच चौधरी यांनी आता परीक्षीत बर्‍हाटे यांच्याविरोधातही आता माघार घेतल्याने ही माघार आता चर्चेचा विषय ठरली असून ही माघार घेण्यामागे काय घडामोडी घडल्या अथवा मोठी तडजोड झाली? असा प्रश्न भुसावळकर उपस्थित करीत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !