भुसावळ पालिका निवडणूक : प्रभाग 4 व 11 मध्ये नऊ बुथवर 20 रोजी मतदान
Bhusawal Municipal Election: Voting will be held at nine booths in wards 4 and 11 on the 20th. भुसावळ (11 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीत अपिल दाखल केलेल्या प्रभागातील उमेदवारांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासाठी 9 बुथवर मतदान होणार आहे. आठ हजार 381 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
नऊ बुथवर होणार मतदान
पालिकेच्या प्रभाग 4 ब व 11 ब मध्ये 20 डिसेंबर रोजी होणार्या मतदानासाठी 9 बुथवर मतदान होणार आहे. 8 हजार 381 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. प्रभाग चारमधील उमेदवार अशोक चौधरी यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने उमेदवार परीक्षीत बर्हाटे यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला. यामुळे आता प्रभाग 4 ब मध्ये मतदान होणार नाही, यामुळे येथे नियुक्त केलेल्या 24 कर्मचार्यांच्या मतदान प्रक्रियेतील ऑर्डर रद्द करण्यात आली. या प्रभागात तीन हजार 681 मतदार होते. प्रभाग 5 ब मध्ये काय होते, याकडे राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांसह मतदारांचे लक्ष लागले होते.


आता केवळ दोन प्रभागात निवडणूक
आता प्रभाग 4 ब आणि प्रभाग 11 ब यामध्ये निवडणूक होणार आहे. प्रभाग 4 ब मध्ये दोन बुथवर मतदान होणार असून येथे एक हजार 562 मतदार आहे तसेच प्रभाग 11 ब मध्ये 7 बुथवर मतदान होईल. येथे सहा हजार 818 मतदार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, सहायक अधिकारी तथा मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची तयारी अंतीम टप्यात आली आहे.







