रिपब्लिकन सेना जिल्हा बैठक संघटनात्मक बळकटी देण्यासाठी महत्वाची : जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे


Republican Army district meeting important for organizational strengthening: District President Vinod Sonawane भुसावळ(12 डिसेंबर 2025) : रिपब्लिकन सेनेची जिल्हा बैठक संघटनात्मक बळकटी देण्यासाठी महत्वाची आहे. आता लवकरच सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत जळगावात मोठा पक्ष प्रवेश सोहळा असल्याने त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले. जळगाव जिल्हा संघटनात्मक बांधणी बैठक अष्टभुजा फॅमिली रेस्टॉरंटजवळ गुरुवार, 11 रोजी दुपारी एका वाजता झाली. या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यांची बैठकीला उपस्थिती
यावेळी कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा नेते दिनेश इखारे, रिपब्लिकन महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, महिला सेना जिल्हा महासचिव वंदना आराक यांनी मनोगत व्यक्त केले.



जिल्हा उपाध्यक्ष मेजर मकासरे, जिल्हा संघटक प्रमोद बावस्कर, स्वप्नील सोनवणे, बंटी सोनकांबळे, हेमंत सोनवणे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी राजश्री सोनवणे, वर्षा सपकाळे, शर्मिला तायडे, मीना भालेराव, प्रमोद बावस्कर, संदीप सोनकांबळे, रवींद्र मोरे (जामनेर), संदीप सुरवाडे (तळवेल), सुरेश बोदोडे (यावल) यांच्यासह अनेक महिला व तरुणांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला.

यावेळी राजेंद्र बारी, हमीद तडवी (यावल), हेमंत सोनवणे (जळगाव), दिलीप भालेराव, आकाश बागुल (भुसावळ), वाल्मिक लोखंडे (भडगाव), दाजिबा गव्हाणे, पूनमचंद निकम (अमळनेर) सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी सूत्रसंचलन जिल्हा संघटक प्रमोद बावस्कर यांनी तर आभार जिल्हा उपाध्यक्ष मेजर मकासरे यांनी मानले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !