भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात आयटीवर मार्गदर्शनपर चर्चासत्र
भुसावळ (13 डिसेंबर 2025) : शहरातील कला, विज्ञान, आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात गुरुवार, 11 डिसेंबर रोजी संगणकशास्त्र, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर अॅप्लीकेशन विभागातर्फे बीएसस्सी, एमएसस्सी विद्यार्थ्यांसाठी इंटरनॅशनल सिम्पोझीया ऑन इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड अॅप्लिकेशन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर बी.एच.बर्हाटे उपस्थित होते.
यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रोफेसर जी.आर.वाणी आणि डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा.डॉ.गौरी पाटील तसेच रिसोर्स पर्सन म्हणून अपूर्वा बर्हाटे (भोळे, सोलुशन इंजिनीअर, गूगल, जर्मनी) आणि भावेश जी. वाणी (रिसर्चर, पॅडरबोर्न युनिव्हर्सिटी, जर्मनी) उपस्थित होते.




प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विदयार्थ्यांना आजच्या बदलत्या नोकरी व व्यवसायातील एआयच्या वापरानुसार आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.
पहिल्या सत्रामध्ये अपूर्वा बर्हाटे(भोळे) यांनी विद्यार्थ्यांना मुलाखत देताना कोणती काळजी घ्यावी तसेच त्यासाठी तयारी कशी करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
दुसर्या सत्रात भावेश वाणी यांनी आपल्या सेशनमध्ये विद्यार्थ्यांना रिसर्च आणि आय टी सेक्टरमध्ये एआयचा कितपत वापर करावा या संबंधी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.पूनम महाजन तर आभार प्रा.तुषार पाटील यांनी मानले. 135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.हर्षल पाटील, प्रा.डॉ.स्वाती फालक, तसेच संगणकशास्त्र विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.