यावल न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत 606 प्रकरणात निपटारा
606 cases were settled at the National Lok Adalat held at the Yaval court. यावल (15 डिसेंबर 2025) : यावल न्यायालयात शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या पॅनल समोर ठेण्यात आलेल्या दाखल पूर्व तसेच फौजदारी आणि दिवाणी एकूण 4 हजार 180 प्रकरणापैकी 606 प्रकरणांमध्ये तडजोडीने निपटारा करण्यात आला. यात 123 लाख 96 हजार 896 रुपयांचा वसूल झाला आहे. सकाळपासूनच न्यायालयात या राष्ट्रीय लोक अदालत करिता पक्षकारांची व विविध वित्तीय संस्थांच्या अधिकारी वर्गांची गर्दी होती.
शनिवारी यावलला लोक अदालत
यावल येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार, 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.. यात राष्ट्रीय लोक अदालतीचे कामकाज विधी सेवा समितचे अध्यक्ष तथा प्रथमवर्ग न्या.आर.एस. जगताप यांच्या पॅनलसमोर चालले. पॅनल पंच वकील अॅड.डी.व्ही.चौधरी होते. या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ग्रामपंचायत, बीएसएनएल, विविध बँका, वित्तीय संस्था व राज्य विद्युत वितरण कंपनीचे बिलांचे दाखल पूर्व प्रकरणे तसेच दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे न्याय प्रलंबित एकूण चार हजार 180 प्रकरण ठेवण्यात आले होते व या प्रकरणापैकी 606 प्रकरणात निपटारा करण्यात आला व यातून तब्बल 123 लाख 96 हजार 896 रूपयांचा वसुल झाला आहे. या लोक अदालतीत सकाळ पासुनचं पक्षकारांची गर्दी झाली होती.




यांनी घेतले परिश्रम
स्थानिक वकील संघाचे अध्यक्ष अॅड.एस.जी.कवडीवाले, अॅड.गौरव पाटील, अॅड.रितेश बारी, अॅड.रियाज पटेलसह संपुर्ण स्थानिक वकील मंडळी व विधी सहाय्यक हेमंत फेगडे, अजय बडे यांच्या माध्यमातून या सर्व दाखल प्रकरणात तडजोेडकरिता पुढाकार घेण्यात आला. या संपूर्ण राष्ट्रीय लोक अदालतीसाठी न्यायालयाचे लघू लेखक आर.एस.बडगुजर, आर.व्ही.आमोदकर, एस.आर.तडवी, के.बी.जावळे, एस.एस.पठाण, ए.बी.पाटील, एस.एस.झांबरे, पी.व्ही.जाधव, बी.डी.बागुले, अविनाश पाफळे सह आदींनी परिश्रम घेतले.