महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला : जळगावसह मुंबई व राज्यातील 29 महापालिकासांठी 15 जानेवारीला मतदान
16 जानेवारीला निकाल : राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार,
The municipal election bugle has sounded : Voting for Jalgaon, Mumbai, and 29 other municipal corporations in the state will be held on January 15 मुंबई (15 डिसेंबर 2025) : मुंबईसह जळगाव व राज्यभरातील 29 महापालिकांसाठी निवडणूक जाहीर झाली असून एकाच टप्प्यात या निवडणुका होणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली. ते म्हणाले की, निवडणुकीच्या दुसर्या दिवशी 16 रोजी निकाल जाहीर होईल व नामनिर्देशन पत्र ऑफलाईन घेण्यात येईल. राजकीय पक्षांच्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात
राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार, अशी माहिची सूत्रांकडून आधीच मिळाली होती. 50 टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही असेही सांगण्यात आले होते.


‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम
मतदान- 15 जानेवारी 2026
मतमोजणी- 16 जानेवारी 2026
दरम्यान, नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिका अशा आहेत की, जिथे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे येथे आधी 50 टक्क्यांच्या आत आरक्षण दिले जाईल, अशा पद्धतीने पुनर्रचना करून मगच तेथे निवडणूक घेतली जाईल, असा तर्क आहे. मात्र, आयोगाच्या सूत्रांनी त्याचा इन्कार केला. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे, अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये, असे न्यायालयाने निकालात कुठेही म्हटलेले नाही त्यामुळे हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.







