भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात एड्स जनजागृती सप्ताह


AIDS awareness week at P.K. Kotecha Women’s College in Bhusawal भुसावळ (15 डिसेंबर 2025) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे रेड रिबीन क्लब अंतर्गत एड्स जनजागृती अभियान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.जीवन धांडे, वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशिका ज्योती गुरव, भावना प्रजापती, रासेयो अधिकारी डॉ.मीना चौधरी, प्रा.एस.बी.नेतनराव, प्रा.निलेश गुरुचळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे दुसरे आजार उद्भवतात
या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी एड्स जनजागृती व युवाशक्ती संबंधित पोस्टर प्रदर्शन मध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. प्रास्ताविक रासेयो अधिकारी डॉ. मीना चौधरी यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.जीवन धांडे होते. ते म्हणाले की, एड्स ह्या आजारात प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे दुसरे अनेक आजार उद्भवतात त्यामुळे त्याबद्दलची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.



डॉ.ज्योती गुरव यांनी एड्सची लक्षणे, एड्स होण्याचे कारण व त्यावर उपचार तसेच या आजारापासून सावध राहण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन रक्षंदा जैनने केले. यशस्वीतेसाठी रासेयो अधिकारी डॉ.मीना चौधरी, प्रा.संदीप नेतनराव, प्रा.निलेश गुरुचळ, प्रा.उज्वला महाजन, प्रा.मुक्ती जैन यांनी परिश्रम घेतले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !