एक कोटींच्या विम्यासाठी रचला मृत्यूचा बनाव : प्रेयसीला मेसेज करताच उलगडले खुनाचे गुपित
A death hoax was staged for an insurance claim of one crore rupees : The secret of the murder was revealed when he messaged his girlfriend लातूर (16 डिसेंबर 2025) : बँकेत रिकव्हरी एजंट असलेल्या इसमाने स्वतःवरील वाढलेले गृहकर्ज फेडण्यासाठी व एक कोटी रुपयांच्या विमा रकमेचा लाभ मिळण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला व पादचार्याला लिप्ट देवून कारमध्ये जाळले. पोलिसांचा तपास सुरू असताना संशयीताने आपल्या प्रेयसीला एका वेगळ्या क्रमांकावर मेसेज केल्यानंतर आरोपीचे बिंग फुटले व त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गणेश चव्हाण असे मृताचे नाव असून तो बँकेत रिकव्हरी एजंट असल्याचे समोर आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
पोलिसांना रविवारी सकाळी औसा तालुक्यात एक जळालेली कार व त्यात मृतदेह आढळला होता. तपासात हा मृतदेह गणेश चव्हाणचा असल्याचे समोर आले मात्र गणेशने या दरम्यान त्याच्या गर्लफ्रेंडला मेसेज केल्याने बिंग फुटले.


पोलिसांनी जळालेल्या कारच्या मालकाचा शोध घेतल्यानंतर त्याने कार नातेवाईक गणेश चव्हाणला दिल्याचे सांगितले व तो घरी परतला नसल्याचे व फोनही बंद आल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला.
पोलिसांनी चव्हाणच्या आयुष्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली आणि त्यांना कळलं की तो एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पोलिसांनी महिलेची चौकशी केल्यानंतर घटनेनंतर गणेश चव्हाणने तिला दुसर्या फोन नंबरवरून मेसेज केल्याचे व चॅटींग केल्याचे समोर आले.
लोकेशन ट्रेस करीत आरोपीला पकडले
संशयीत गणेशचे लोकेशन काढल्यानंतर कोल्हापूर आणि नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे पोलीस पोहोचले व त्यांनी गणेशला अटक केली. चव्हाणची चौकशी केल्यावर त्याने एक कोटी रुपयांची जीवन विमा पॉलिसी घेतल्याचे व त्याला गृहकर्ज फेडण्यासाठी पैसे हवे असल्याने त्याने ते पैसे मिळवण्यासाठी खुनाचा कट रचल्याची कबुली दिली.
चव्हाणने औसा येथील तुळजापूर टी-जंक्शनवर गोविंद यादव नावाच्या एका व्यक्तीला लिफ्ट दिली. यादव नशेत होता आणि चव्हाणने याचा फायदा घेतला. ते एका ढाब्यावर थांबले आणि नंतर वनवाडा रोडकडे गेले. गाडी पार्क केल्यानंतर यादवने काही खाल्ले आणि लवकरच गाडीत झोपी गेला. नंतर चव्हाणने त्याला ड्रायव्हरच्या सीटवर ओढले, सीटबेल्ट लावला, सीटवर माचिसच्या काड्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या ठेवल्या आणि त्यांना आग लावली. याचबरोबर चव्हाणने आपले ब्रेसलेट यादवजवळ सोडले.







