भुसावळातील चर्चमध्ये नाताळ, नववर्षानिमीत्त धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
अलायन्स मराठी चर्चमध्ये 17 पासून कॅरल सिंगिंग, उपासना, स्पर्धा
Churches in Bhusawal are abuzz with religious and cultural programs for Christmas and New Year भुसावळ (16 डिसेंबर 2025) : ख्रिस्त जन्मोत्सव व नूतन वर्षानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील अलायन्स मराठी चर्चतर्फे 17 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये कॅरल सिंगिंग, विशेष उपासना, चर्च स्वच्छता व सजावट, स्पर्धा, संडे स्कूल कार्यक्रम, चर्च पिकनिक तसेच वॉच नाईट सर्विसचा समावेश आहे.
उद्यापासून कार्यक्रमांची सुरूवात
कार्यक्रमांची सुरुवात बुधवारपासून संध्याकाळी 7 वाजता शहरातील विविध भागांमध्ये कॅरल सिंगिंगने होणार आहे. 18, 19 व 20 डिसेंबर रोजीही वेगवेगळ्या वसाहतींमध्ये कॅरल सिंगिंगचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (21 डिसेंबर) रोजी सकाळी प्रभुवार भक्ती व उपासना होणार असून या उपासनेस पास्टर स्वप्नील नाशिककर मार्गदर्शन करणार आहेत. 22 व 23 डिसेंबर रोजी चर्च स्वच्छता, डेकोरेशन व कॅरल सिंगिंगचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. 24 डिसेंबर रोजी ख्रिस्त जन्मोत्सव पूर्वसंध्येची विशेष उपासना, तर 25 डिसेंबर रोजी सकाळी ख्रिस्त जन्मोत्सवाची विशेष भक्ती आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय 26 व 27 डिसेंबर रोजी विविध स्पर्धा, क्रीडा उपक्रम, निबंध लेखन व चित्रकला स्पर्धा होणार आहेत. 28 डिसेंबर रोजी संडे स्कूलचा विशेष कार्यक्रम, 29 डिसेंबर रोजी स्तुती-उपासना, तर 30 डिसेंबर रोजी चर्च पिकनिकचे आयोजन करण्यात आले आहे.




1 रोजी प्रीती भोजनाने कार्यक्रमांची सांगता
31 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता भजन व वॉच नाईट सर्विस होणार असून, 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी नवीन वर्ष उपासना, प्रभुभोजन, बक्षिस वाटप व प्रीतीभोजनाने कार्यक्रमांची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन तरुण संघ अध्यक्ष ब्र. मार्टिन व्ही. पवार, तरुण संघ, महिला संघ व संडे स्कूलच्या सहकार्याने करण्यात आले आहे. भाविकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन पास्टर स्वप्नील नाशिककर, प्रविण ओहोळ, फिलीप एस फ्रान्सिस, प्रेमचंद जाधव, जया फ्रान्सिस मणी व चर्च समितीतर्फे करण्यात आले आहे.