यावलला आदिवासी समाज बांधवांचे आंदोलन


Protest by tribal community members in Yaval यावल (16 डिसेंबर 2025) : शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात सोमवारी जळगाव जिल्ह्यातील वनपट्टे वितरण करण्यात आलेल्या आदिवासी समाजबांधवांनी आंदोलन केले. जिल्ह्यातून विविध वाहनाद्वारे आदिवासी समाज बांधव या ठिकाणी एकवटले होते.

यांचा आंदोलनात सहभाग
आदिवासी समाज बांधवांचे वतीने लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, ताराचंद पावरा, भगतसिंग पाटील, फुलसिंग बारेला, प्रताप बारेला, दिनू बारेला, अजय पावरा यांच्या वतीने प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्याकडे आदिवासी बांधवांच्या मागण्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वन हक्क कायदा 2006, 2008 आणि सुधारित 2012 नुसार अंशतः मंजूर करण्यात आलेल्या वनदाव्यात वनपट्टेधारकांना अल्प प्रमाणात वनपट्टे वितरण करण्यात आले. त्यांना पूर्णपणे वनपट्टे दिले जावे अशी त्यांची मागणी आहे.



या मुख्य मागणीसह सन 2017 व 2018 मध्ये अपील साठी प्रलंबित असलेले वन दावे निकाली काढून त्या लाभार्थ्यांना देखील वनपट्टे वितरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान अंशतः वनपट्टे वाटप झाल्यानंतर संबंधितांना पूर्ण वनपट्टे मिळावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी येथे येऊन आंदोलकांशी चर्चा करावी अशी प्रारंभी मागणी करण्यात आली मात्र प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी आंदोलकांची समजत काढून अंशतः मंजूर दावे कसे मंजूर करण्यात आले या संदर्भातील त्यांच्या फाईल तपासणीसाठी येथे बोलवल्या. सकाळी 11 वाजेपासून आंदोलन येथे येण्यास सुरुवात झाले होते सायंकाळी पाच वाजेपर्यंत देखील आंदोलकांमध्ये तडजोड करण्याचे काम सुरू होते.

जिल्हाभरातील आदिवासी बांधव एकवटले
आंदोलनासाठी यावल, रावेर तालुक्यासह चोपडा, अमळनेर, एरंडोल, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर या तालुक्यातून मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधव यावलला दाखल झाले होते. सुमारे दीड हजार आदिवासी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !