भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयाचे खडका येथे हिवाळी शिबिर
A winter camp of P.O. Nahata College, Bhusawal, was held at Khadka भुसावळ (16 डिसेंबर 2025) : शहरातील कला, विज्ञान आणि पू.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील राा.से.यो.+2 स्तर चे विशेष निवासी हिवाळी शिबिराचे उद्घाटन ज्ञानज्योती विद्यालय खडके येथे सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी उपस्थित होते. स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल चिंधू वारके, चेअरमन प्रमोद भागवत भोळे व सचिव केशव अवचित धांडे व ज्ञानज्योती विद्यालयाचे उपमुख्याध्यापक यु.बी.बाविस्कर यांची विशेष उपस्थिती होती.




समाजासाठी जगा : मोहन फालक
उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर चे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा.एन.पी.निळे यांनी प्रास्ताविक केले. मोहन फालक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्वयंसेवकांना स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगावे. आपण जे देणे लागतो ते कशा पद्धतीने पूर्ण करावे त्यात आपले कर्तव्य काय असते त्यातून मार्ग काढत समाजसेवा कशी करावी हे समजावून यासाठी आपल्याला राष्ट्रीय सेवा योजना कशा पद्धतीने मदत करते हे सांगितले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाला नाहाटा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका स्वाती पाटील यांनी निवासी हिवाळी शिबिराला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन स्वयंसेविका श्रद्धा परदेशी तर आभार स्वयंसेविका एंजल म्हस्केने मानले. राष्ट्रीय सेवा योजना समितीतील इतर सहाय्यक अधिकारी टी.एस.सावंत, एस.के.चौधरी, एस.एम.फेगडे, एन.एस.गवळी उपस्थित होते.