यावलला होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त वृध्दाश्रमातील वृध्दांना साहित्य वाटप


On the occasion of Home Guard Foundation Day in Yaval, supplies were distributed to the elderly residents of the old age home यावल (18 डिसेंबर 2025) : यावलला होमगार्ड पथकाकडून होमगार्ड वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम व विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. यात शहरातील यशोदा आई वृध्दाश्रमात जावुन तेथील वृध्दांना उबदार कपड्यांचे वितरण करण्यात आले. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. होमगार्ड बांधवांकडून शहरात विविध कार्यक्रम देखील राबवण्यात आले आहे.

विविध उपक्रमांचे कौतुक
अपर पोलिस अधिक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अशोक नखाते, प्रशासकीय अधिकारी रामनाथ काळे, केंद्रनायक गंगाधर महाजन सामग्री प्रबंधक सुभेदार मदन रावते यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका समादेशक अधिकारी विजय जावरे यांनी 79 वा होमगार्ड वर्धापन दिन शहरात साजरा केला. या निमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या यशोदा आई वृध्दाश्रमात जावुन त्यांना थंडीचे ब्लँकेट, उबदार कपडे वाटप करण्यात आले.





यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेकरीता तालुका समादेशक अधिकारी विजय जावरे, वरिष्ठ पलटण नायक पंकज फिरके, अनायुक्त अधिकारी ज्योती बारी, भगवान पाटील, संगीता पाटील, अर्चना कोळी, निशा कदम, कैलास लावणे, टेकचंद फेगडे, प्रवीण तेली, सोनल कोळी, मुमताज चिखलीकर, रऊफ खान, वसीमोद्दीन, सागर पाठक, अशोक बडगुजर, संतोष बारी, संदीप कोळी तसेच महिला पुरुष होमगार्ड सहकार्य केले.

वाढदिवस निमित्ताने अन्नदान
वृध्दाश्रमात गावातील अथर्व बयणी यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले. अथर्व बयणी, विनोद बयणी, दर्शना बयणी उपस्थित होते. सर्व वृद्ध, ज्येष्ठांना नमन करीत त्यांचे आशिर्वाद प्रसंगी त्यांनी घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !