बिलासपूर-मडगाव, वलसाड दरम्यान 16 विशेष साप्ताहिक एक्सप्रेस धावणार

डिसेंबर ते जानेवारीदरम्यान प्रत्येकी आठ फेर्‍या होणार !


16 special weekly express trains will run between Bilaspur-Madgaon and Valsadभुसावळ (20 डिसेंबर 2025) : शीतकालीन कालावधीत प्रवाशांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने बिलासपूर-मडगाव तसेच बिलासपूर-वलसाड मार्गावर विशेष साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी 8 अशा एकूण 16 विशेष सेवा डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत चालविण्यात येणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेष गाडीच्या आठ फेर्‍या होणार
बिलासपूर-मडगाव विशेष साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीच्या आठ फेर्‍या होणार आहे. विशेष गाडी क्रमांक 08241 ही गाडी 20 डिसेंबर 2025 ते 10 जानेवारी 2026 दरम्यान प्रत्येक शनिवारी बिलासपूर येथून दुपारी 2.45 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी पहाटे 2.15 वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 08242 ही गाडी 22 डिसेंबर 2025 ते 12 जानेवारी 2026 दरम्यान प्रत्येक सोमवारी मडगाव येथून सकाळी 5.30 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सायंकाळी 4 वाजता बिलासपूर येथे पोहोचेल. या गाडीला भाटापारा, रायपूर, दुर्ग, राजनंदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.





बिलासपूर-वलसाड विशेष साप्ताहिक एक्सप्रेस
बिलासपूर-वलसाड विशेष साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीच्या आठ फेर्‍या होतील. विशेष गाडी 08243 ही गाडी 18 डिसेंबर 2025 ते 8 जानेवारी 2026 दरम्यान प्रत्येक गुरुवारी बिलासपूर येथून सायंकाळी 4 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी 1.50 वाजता वलसाड येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी 08244 ही गाडी 19 डिसेंबर 2025 ते 9 जानेवारी 2026 दरम्यान प्रत्येक शुक्रवारी वलसाड येथून सायंकाळी 4.50 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी 1.50 वाजता बिलासपूर येथे पोहोचेल.

या गाडीला भाटापारा, रायपूर, दुर्ग, राजनंदगाव, डोंगरगड, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदुरबार, चलथान आणि भेस्तान येथे थांबे असणार आहेत. गाडीमध्ये वातानुकूलित, शयनयान व सामान्य श्रेणीचे डबे असतील. या विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी संकेतस्थळावर खुले असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !