सक्षम, विकसीत भारताचे स्वप्न : डॉ.उल्हास पाटील
The dream of a capable, developed India : Dr. Ulhas Patil जळगाव (1 फेब्रुवारी 2026) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 2025-26 च्या आर्थिक सर्वेक्षणातील सकारात्मक आकडेवारीवर आधारित अर्थसंकल्प सादर केला आहे, ज्यामध्ये भारताचा संभाव्य विकास दर 7 टक्के असल्याचा अंदाज आहे. अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी अनेक दूरगामी घोषणा केल्याचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील म्हणाल्या
जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याचा संकल्प
आरोग्य क्षेत्राप्रती संवेदनशीलता दाखवत अर्थमंत्र्यांनी 17 कर्करोगाच्या औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी वैद्यकीय उपचार परवडणारे बनवण्यासाठी आणखी सात दुर्मिळ आजारांवरील औषधे शुल्कमुक्त यादीत समावेश केला आहे. आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. सुधारित रिटर्न भरण्यासाठी तीन महिने अधिक वेळ देण्यात आला. याचा अर्थ सुधारित रिटर्न आता 31 डिसेंबरऐवजी 31 मार्चपर्यंत दाखल करता येतील. तीन आयुर्वेदिक एम्स उघडण्याची घोषण, वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पाच वैद्यकीय केंद्रे देखील स्थापन करण्याची घोषणा निश्चीतच स्वागतार्ह आहे. जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याचा संकल्प या माध्यमातून दिसून आल्याचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील म्हणाले.


