भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात अर्थसंकल्प 2026 या विषयावर कार्यशाळा


A workshop was held at D.N. Bhole College in Bhusawal on the topic of Budget 2026 भुसावळ (7 फेब्रुवारी 2026) : दि पीपल्स चॅरिटेबल संस्था संचालित दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाने शुक्रवार, 6 रोजी अर्थसंकल्प 2026 या विषयावर कार्यशाळा आयोजित केली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. प्रमुख वक्ते म्हणून भुसावळ शहरातील प्रख्यात सीए मुकेश अग्रवाल होते.

पायाभूत सेवांना बळकटी देणारा अर्थसंकल्प
सी.ए.मुकेश अग्रवाल यांनी 2026 च्या अर्थसंकल्प युवाशक्तीचलित असून देशांतर्गत उत्पादन मजबूत करणे, उच्च विकास सेवांचे प्रमाण वाढवणे व पायाभूत सुविधांना पायाभूत सुविधांना बळकटी देणे यावर भर देण्यात आला असल्याचे सांगितले. प्रगत औषध निर्माण शिक्षण संशोधन आणि कौशल्य विकास मजबूत करण्यासाठी तीन नवीन राष्ट्रीय संस्थांची स्थापना व विद्यमान संस्थांचे अपग्रेडेशन करणे, उपकरणे साहित्य डिझाईन साखळीत लवचिकतेसाठी इंडिया सेमीकंडक्टर क्षमतांचा विस्तार करण्यासाठी रुपये 40 हजार कोटीच्या वाढीव खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतातील डेटा सेंटर पायाभूत सुविधा वापरून क्लाऊड सेवा प्रदान करणार्‍या कंपन्यांना कर सवलती सुविधा देण्यात आली आहे. क्लाऊड सुविधा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवांचा पाया मजबूत करणे जिल्हास्तरीय कॅन्सर प्रगत उपचार पद्धती सुरू करणे याबद्दलची अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती त्यांनी दिली.

नवीन आयकर कायद्याची 1 एप्रिलपासून अंमलबजावणी
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, नवीन आयकर कायदा एक एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. त्यामध्ये कर प्रणाली सुलभ होणार आहे. उत्पन्न कर स्लॅबमध्ये सवलत, सोपे आयटीआर फॉर्म असा नवीन कायदा पारदर्शक व समजण्यास सोपा व करदात्यांचा सोयीचा असेल. करदात्यांना नाममात्र शुल्क भरून सध्याच्या मुदती ऐवजी त्यांचे विवरणपत्र सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत वेळ देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविक प्रा.डॉ.जयश्री सरोदे तर आभार प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्ध प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !