बोरावल शेत-शिवारात मधमाशांच्या हल्ल्यात यावल शहरातील तरुणाचा मृत्यू
यावल (10 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातील बोरावल गावाच्या शेत-शिवारात मंगळवारी सकाळी यावल येथील तरुण हा केळीच्या शेतात केळी घडाला पत्तीने झाकण्याचे काम करीत होता. दरम्यान त्याच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. हा प्रकार निदर्शनास येताच संबंधित शेतकर्याने रुग्णवाहिका बोलावून तरुणाला यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश रवींद्र देशमुख (38, रा.देशमुख वाडा, यावल) असे मयताचे नाव आहे.
काय घडले तरुणासोबत
बोरावल, ता.यावल गावाच्या शेत शिवारात निमगाव येथील शेतकर्याचे शेत आहे. या शेतात मंगळवारी सकाळी गणेश रवींद्र देशमुख (38, रा.देशमुख वाडा, यावल) हा तरुण केळी घडाला पत्तीने झाकण्याचे काम करण्यासाठी गेला होता. दरम्यान, केळीच्या बागातच त्याच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात तरूण हा बेशुद्ध पडला. हा प्रकार सदर शेतकरी शेतात गेल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेद्वारे त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात राहुल झांबरे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ल तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहे.
कुटूंबावर मोठा आघात
मयत गणेश देशमुखच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि एक दोन महिन्याची लहान मुलगी आहे. तरुणाच्या अकलीा मृत्यूमुळे शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.






