भडगाव तालुका हादरला : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची निर्घृण हत्या
वसंतवाडी तांड्यावरील प्रकार : चाकूने केला पत्नीवर हल्ला
भडगाव (रविवार, 26 जुलै 2026) : भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. या धक्कादायक घटनेने भडगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली. खुनाची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली.
काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे 8.30 वाजता भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतवाडी तांडा येथे आत्माराम पतीलाल राठोड (40) याने पत्नी ललिता आत्माराम राठोड (36) कडे हने दारू पिण्यासाठी पैसे मागितली मात्र नेहमीच्या वादाला कंटाळून पत्नीने पैसे देण्यास नकार दिला व त्याचा राग मनात धरून आरोपी पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात ललिता राठोड यांच्या पोटावर गंभीर वार करण्यात आले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. खुनाची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कौटूंबिक हिंसाचारात वाढ
दारूच्या व्यसनातून उद्भवणार्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अशा घटना रोखण्यासाठी व्यसनमुक्ती, सामाजिक जनजागृती आणि कौटुंबिक समुपदेशनाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



