!-- afp header code starts here -->

उत्तम नागरिक होणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय : ज्ञानेश्वर पाटील

काहुरखेडे शाळेचा 114 वा वर्धापनदिन उत्साहात


The true goal of education is to become a good citizen: Dnyaneshwar Patil भुसावळ (13 फेब्रुवारी 2026)  :उच्च शिक्षणाद्वारे नोकरी मिळवणे हे ध्येय नसून उत्तम नागरिक होणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय असल्याच विचार ाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी व्यक्त केले. काहूरखेडा, ता.भुसावळ येथे जिल्हा परिषद शाळेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रम करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व शाळा परिवाराची उत्स्फूर्त उपस्थिती होती.


यांची होती उपस्थिती
यावेळी दिगंबर पाटील, कृष्णा पाटील, सोपान पाटील, देविदास बोरसे, अरुण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चंदाबाई पाटील, गणपत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे यांनी सूत्रसंचालन तर आभार उपशिक्षक समाधान जाधव यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !