शेळगाव बॅरेजवरील तापी नदीच्या पुलाचे काम संथ गतीने
यावल (14 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातुन शेळगावमार्गे जळगाव जाण्याकरीता महत्वा दुवा म्हणुन तापी नदीवरील पुलाचे काम रंगाळले आहे या कामाची मुदत सन 2024 मध्ये संपली होती मात्र, आता 2026 आले तरी काम पुर्ण झाले नाहीये, परिणामी संथ गतीन सुरू असलेले पुलाचे काम कधी पुर्ण होईल असा प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.
पर्यायी रस्ता वारंवार नादुरुस्त
यावल तालुक्यातुन जळगाव जाण्या करीता कमी वेळ व कमी अंतराचा मार्ग हा शेळगाव बॅरेज मार्गे जळगाव हा आहे. तर शेळगाव बॅरेज उभारणीच्या निधीतचं बँरेजला लागुन तापी नदीवर पुल मंजुर करण्यात आला होता.तर हा पुल ऑगस्ट 2024 पर्यंत पुर्ण होणे अपेक्षीत होते मात्र, या पुलाचे काम निधी अभावी संथ गतीने सुरू आहे. तर स्थानिक तालुक्यातील नागरिकांना जळगाव जाण्याकरीता या रस्त्याचा वापर करतात. पुला जवळ पर्यायी रस्ता बनवण्यात आला असुन तो वारंवार नादुरूस्त होत असतो. काही दिवसापुर्वी रस्त्यावर पाणी साचल्याने नागरीकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या व चिखल झाल्याने दुचाकी सुद्धा या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. एकी कडे प्रशासनाची पुलासाठी दाखवलेली कासव गती व दुसरी पर्यायी रस्त्याची दैयनिय अवस्थे मुळे वाहन धारक त्रस्त झाले आहे. तेव्हा या रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे अशी मागणी आहे.

तापी खोर्यात बिबट्याची भीती
तापीच्या खोर्यात याचं परिसरात सद्या बिबटयाचा वावर समोर आला आहे. यात तर रात्री अपरात्री या पर्यायी तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर चिखलात कोणी अडकले तर त्याच्या जिवावर बेतू शकते असे नागरीकांचे म्हणने आहे तेव्हा या पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी आहे.
सुप्रमा अंतिम मंजुरीकरीता सादर
प्राप्त माहिती नुसार तीन वर्षांपासुन या पुलाच्या कामा करीता शासना कडून निधी मिळाला नसल्याने काम संथगतीने झाले तर आता सुधारीत प्रशासकिय मान्यते साठी प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. व त्यास लवकरचं मंजुरी मिळणे अपेक्षीत असुन या वर्षाअखेर पुलाचे काम पुर्ण होईल अशी माहिती संबधीत विभागाकडून मिळाली आहे.-पुर्ण–






