!-- afp header code starts here -->

भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात 28 रोजी राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषद

साहित्य, तत्त्वज्ञान, भारतीय ज्ञानपरंपरा विषयावर मंथन


भुसावळ (18 फेब्रुवारी 2026) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालय मानव्यविद्या विभागातर्फे दि. 28 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

महानुभाव संप्रदाय साहित्य, तत्त्वज्ञान आणि भारतीय ज्ञानपरंपरा हा परिषदेचा विषय असून देशभरातील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. परिषदेचे उद्घाटन मान्यवर विद्वानांच्या हस्ते होणार असून विविध विद्यापीठांतील नामवंत प्राध्यापक प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेत महानुभाव संप्रदायाचे साहित्य, सामाजिक तत्त्वज्ञान, धार्मिक विचार, नैतिक मूल्ये तसेच भारतीय ज्ञानपरंपरेतील योगदान यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. संशोधकांनी आपले संशोधन निबंध सादर करावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संशोधन निबंध मराठी व हिंदी भाषेत स्वीकारले जाणार असून निवडक निबंध आंतरराष्ट्रीय मानांकन क्रमांकासह प्रकाशित करण्यात येणार आहेत. शोधपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि. 20 फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे. या परिषदेच्या माध्यमातून महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास, साहित्यिक योगदान आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील स्थान व्यापक स्वरूपात अधोरेखित होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. परिषद यशस्वी करण्यासाठी प्राचार्य बी. एच. बर्‍हाटे, उपप्राचार्य डी. एन. पाटील, उपप्राचार्य जी. आर. वाणी, समन्वयक प्रमोद अहिरे यांच्यासह आयोजन समिती व प्राध्यापकवर्ग परिश्रम घेत असून संशोधक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !