!-- afp header code starts here -->

भुसावळात भारतीय जनता पार्टीतर्फे शिवरायांना अभिवादन


भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 वी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे शहरातील रेल्वे स्थानकासमोरील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

शिवरायांचा जयघोष
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे संजय सावकारे यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय..! जय भवानी जय शिवाजी..! घोषणा दिल्या.

जयंतीनिमित्त पुतळ्याचा संपुर्ण परिसर हा सुशोभित करण्यात आला. रात्रीपासूनच महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करण्यासाठी शिवभक्तांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी भारतीय जनता पार्टीचे गटनेते युवराज लोणारी, उपनगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, पिंटू कोठारी, परीक्षीत बर्‍हाटे, मनोज बियाणी, प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, बापू महाजन, अ‍ॅड.बोधराज चौधरी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, आशिष पटेल, सुजित भोळे, अल्बर्ट तायडे, विलास सातदिवे, कैलास पाटील, सरचिटणीस अमोल महाजन, सागर चौधरी, जयंत माहुरकर, महिला आघाडीच्या अनिता आंबेकर, वैशाली सेतवाल, शोभा इंगळे, राजू खरारे, शंकर शेळके, प्रा.प्रशांत नरवाडे, रवी ढगे, चेतन बोरोले, अमोल पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष संतोष ठोकळ, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष रिषभ राजपूत, वसंत पाटील, प्रमोद पाटील, अभिजीत मराठे, शैलेंद्र ठाकरे, किरण पाटील, उदय पाटील, प्रा.प्रशांत पाटील, रुपेश देशमुख, कैलास शेलोडे, गौरव आवटे, गुड्डू शेठ अग्रवाल, भागवत सावकारे, भरत उमरीया यांच्यासह शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !