राज्यातील तीन आयएएस अधिकार्यांच्या बदल्या
पुणे (12 मार्च 2026) : राज्यातील तीन आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून पिंपरी चिंचवड महापालिकेला आता कायमस्वरुपी आयुक्त मिळाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी आयुक्त पदावर विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली.
यापूर्वी विजय सूर्यवंशी हे मुंबई कोकण विभागाचे विभागीय आयुक्त होते तर त्यांच्यासह आणखी दोन सनदी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून बापू पवार आणि महेश आव्हाड यांचीही बदली करण्यात आली. बुधवार, 11 मार्च रोजी या तिन्ही अधिकार्यांचा बदली आदेश जारी करण्यात आला आहे.




डॉ.विजय सूर्यवंशी हे 2006 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या ते कोकण विभाग, मुंबई येथे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आता, त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका महानगरपालिका आयुक्त, येथे नियुक्ती देण्यात आली.
बापू पवार यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले. यापूर्वी ते राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सहसचिव म्हणून कार्यरत होते. बापू पवार हे 2015 चे आयएस अधिकारी आहेत तसेच महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश आव्हाड यांना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महेश आव्हाड हेही 2015 च्या बॅचचे आयएएस आहेत. त्यामुळे, मुंबईतील दोन अधिकार्यांना पुण्यात पाठवण्यात आलं आहे.
प्रभारी आयुक्त हर्डीकरांच्या जागी विजय सूर्यवंशी
पिंपरी चिंचवड महापालिकेला कायमस्वरूपी आयुक्त लाभले. आयुक्त म्हणून विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. सूर्यवंशी सध्या कोकणचे विभागीय आयुक्त म्हणून काम पाहत होते तर श्रावण हर्डीकर हे पिंपरी चिंचवड पालिकेचे प्रभारी आयुक्त होते. आता हर्डीकर यांच्या जागी पूर्णवेळ आयुक्त म्हणून सूर्यवंशी कामकाज पाहतील.