भरधाव वाहनाची दुचाकीला धडक : जळगावातील दाम्पत्य ठार
Speeding Vehicle Collides with Two-Wheeler : Couple from Jalgaon Killed जळगाव (26 मार्च 2026) : दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दाम्पत्य ठार झाले. हा अपघात जळगाव तालुक्यातील उमाळा-गाडेगावजवळ झालेल्या बुधवार, 25 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. मुझफ्फर अली सय्यद बबन (60) व ताहेराबी मुजफ्फर अली (55, दोन्ही रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) अशी मृत दाम्पत्याची नोव आहेत.
असा घडला अपघात
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये मुझफ्फर अली सैय्यद बबन हे पत्नी ताहेराबी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. मसाला विक्री करून ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवार, 25 मार्च रोजी त्यांच्या चुलत भावाच्या मुलीचे लग्न असल्याकारणामुळे ते आपल्या पत्नी ताहेराबी यांच्यासोबत दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ई.जे.3898) ने जळगाव येथून फर्दापूर येथे गेले होते. लग्न आटोक्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील उमाळे ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीसह दोघे कोसळले.

या भीषण अपघातात मुझफ्फर अली सय्यद बबन आणि ताहेराबी मुजफ्फर अली हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून दोघांना मयत घोषित केले.
अपघातानंतर माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच गर्दी केली होती. अचानक या घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले व विवाहित मुलगी असा परिवार आहे.




