भुसावळात महिलेला मारहाण : सहा संशयीतांविरोधात गुन्हा
Woman Assaulted in Bhusawal : Case Registered Against Six Suspects भुसावळ (26 मार्च 2026) : घरातील सामान का चोरले ? याचा जाब विचारल्याच्या रागातून महिलेला सहा संशयीतांनी मारहाण केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले शहरात ?
जमीलाबी रऊफ कुरेशी (40, मटण मार्केट, ईस्लामपूरा, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवार, 24 रोजी दुपारी अडीच वाजता संशयीत मोहसीन शेख यांच्या घरासमोर त्यांच्या घरातील सामान संशयीतांनी का चोरले? हे विचारण्यासाठी गेल्यानंतर संशयीतांनी शिविगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी मोहसीन उर्फ बिल्लू शेख, शाहरुख शेख मुन्ना, फारुख शेख मुन्ना, पिंकी मोहसीन शेख, मढ्ढो शाहरुख शेख, सुरय्या मुन्ना शेख (सर्व रा.मटण मार्केट, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गणेश चौधरी करीत आहेत.





