भुसावळात अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकी लांबवली


Two-wheeler stolen from apartment parking in Bhusawal भुसावळ (26 मार्च 2026) : शहरातील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी दुचाकी लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाढत्या चोर्‍यांनी वाहनधारकांमध्ये घबराट
अनंत जनार्दन पाटील (37) हे नोकरदार असून शहरातील स्वामी समर्थ कॉलनीतील शुभ-लाभ अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्याकडे नोकरीवर जाण्यासाठी बजाज पल्सर (एम.एच.49 झेड.9694) असून ती त्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केल्यानंतर चोरट्यांनी 5 ते 6 मार्चच्या दरम्यान संधी साधून 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार कांतीलाल केदारे करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !