चाळीसगावात कंत्राटदाराचे घर फोडले : तीन लाखांचा ऐवज लंपास
Contractor’s House Burglarized in Chalisgaon: Valuables Worth ₹3 Lakh Stolen चाळीसगाव (27 मार्च 2026) : चाळीसगाव शहरातील मुंदखेडा रोडवरील महादेव चौक परिसरात एका बांधकाम कंत्राटदाराच्या बंद घरातून चोरट्यांनी सुमारे दोन लाख 92 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाढत्या चोर्यांनी नागरिकांमध्ये घबराट निर्मण झाली आहे.
घर बंद असल्याची साधली संधी
रवींद्र वाल्मिक महाजन (42, रा. मुंदखेडा रोड, चाळीसगाव) हे व्यवसायाने बांधकाम कंत्राटदार आहेत. 25 मार्च रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 92 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. हा प्रकार गुरुवार, 26 मार्च रोजी सकाळी आठ वाजता समोर आला. याप्रकरणी रवींद्र महाजन यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले हे करीत आहे.





