मुक्ताईनगरात अडीच लाखांचा गुटखा जप्त : बार्शीतील आरोपीला बेड्या


Gutkha Worth ₹2.5 Lakh Seized in Muktainagar : Accused from Barshi Arrested मुक्ताईनगर (27 मार्च 2026) : राज्यात गुटख्याला बंदी असलीतरी पूर्णाडमार्गे चोरटी वाहतूक सुरू असतानाच अन्न व औषध प्रशासन विभागासह मुक्ताईनगर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून केलेल्या कारवाईत सुमारे अडीच लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. अनिकेत शिवाजी सुरवसे (35, रा.सावरगाव, ता.बार्शी, जि.सोलापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गुटखा साठा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाटा ते सुकळी गावादरम्यान राशा बर्डाजवळ 26 रोजी चारचाकी (एम.एच.14 डी.एक्स.1463) ला अडवून झडती घेतल्यानंतर त्यात दोन लाख 43 हजार 360 रुपये किंमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला व व्ही एक तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला तसेच चार लाख रुपये किंमतीचे वाहन, पाच हजारांचा मोबाईल मिळून एकूण सहा लाख 48 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश गोसावी, हवालदार भाऊराव घेटे, नाईक असीम तडवी, कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, कॉन्स्टेबल जवाहर पवार आदींच्या पथकाने केली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अनिकेत शिवाजी सुरवसे (35, रा.सावरगाव, ता.बार्शी, जि.सोलापूर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !