अमळनेरात गावठी कट्ट्यातून मिस फायर : मंडप व्यावसायीक तरुणाचा जागीच मृत्यू


Misfire from Country-Made Pistol in Amalner : Young Marquee Contractor Dies on the Spot अमळनेर (28 मार्च 2026) : गावठी कट्टा हाताळताना ट्रीगर दाबला जावून मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना अमळनेर शहरातील अमलेश्वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री 9.20 वाजेच्या सुमारास घडली. अरुण सुरेश महाजन (35) असे मृताचे नाव असून ते कुबेर मंडप या नावाने मंडप व्यवसाय करीत होते. या प्रकरणी भूषण देविदास महाजन विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

काय घडले शहरात ?
अरुण महाजन हे शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास भूषण महाजनच्या घरात असताना यावेळी गावठी कट्टा हाताळत असताना त्यांच्याकडून ट्रीगरवर बोट पडल्यानंतर गोळी सुटली व ती अरुण यांच्या छातीवर डाव्या बाजूला लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. या घटनेनंतर त्यांना तातडीने डॉ.अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले असता त्यांना तपासून मृत घोषित करण्यात आले.


पोलिस अधिकार्‍यांची धाव
डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, मिलिंद सोनार, सुनील तेली, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशिव, सूर्यकांत साळुंखे, नितीन मनोरे, शेखर साळुंखे आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळावरून गोळीची कॅप जप्त
अमलेश्वर नगरातील भूषण देविदास महाजन यांच्या घरात त्यांच्या हातून घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून गावठी कट्टा तसेच त्यातून गोळी झाडल्यानंतर घटनास्थळी पडलेली कॅप (पेंदा) जप्त केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !