पत्नीचे गावातील तरुणाशी प्रेमसंबंध ; संधी मिळताच धुळे तालुक्यात दाम्पत्याने खून करीत मृतदेह टाकला विहिरीत : हातावरील टॅटूमुळे उलगडले खुनाचे गुपित

मोहाडी पोलिसांकडून खुनाच्या गुन्ह्याची उकल : आरोपी दाम्पत्याला अटक


Wife Engaged in Affair with Local Youth ; Seizing an Opportunity, Couple Commits Murder in Dhule Taluka and Dumps Body in Well—Murder Mystery Solved Thanks to Tattoo on Hand. धुळे (1 मार्च 2026) : पत्नीचे गावातील 35 वर्षीय तरुणाशी असलेल्या प्रेमसंबंधातून संतप्त पतीने संधी मिळताच तरुण नशेत असताना त्यास मारहाण करीत विहिरीत टाकले व या कृत्यात पत्नीसह अल्पवयीन मुलाची मदत घेतली. तब्बल 11 दिवस मृतदेह विहिरीत राहिल्याने कुजल्यानंतर सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा कयास होता मात्र शवविच्छेदन अहवालात मृताच्या डोक्याला मारहाणीचा अहवाल आल्यानंतर तपासाची चके्र फिरवली व मयताच्या हातावरील टॅटूमुळे ओळख पटल्यानंतर खुनाचा उलगडा करण्यात मोहाडी पोलिसांना यश आले.

दाम्पत्याला पोलिसांकडून अटक
रवी यशवंत मालचे (35, रा.दिवाणमळा, ता.धुळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून खून प्रकरणी बापू निंबा मालचे व त्याची पत्नी राधाबाई बापू मालचे (दिवाणमळा, ता.धुळे) यांना अटक करण्यात आली.


असे आहे खून प्रकरण
धुळे तालुक्यातील दिवाणमळा येथे बापू मालचे हा पत्नी राधाबाई व मुलासह वास्तव्यास आहे. राधाबाई हिचे गावातील तरुण रवी मालचे सोबत प्रेमसंबंध जुळले व ही कुणकुण पती बापू मालचेला कळाल्यानंतर त्याच्या डोक्यात संतापाची आग तळपली. 18 मार्च रोजी रवी हा नशेत असताना आरोपी बापू मालचेने त्यास मारहाण केली तसेच पत्नी व मुलाला सोबत घेत त्याचा मृतदेह अवधान एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स कंपनीलगत असलेल्या नळी नाल्यालगतच्या दिवाणमळा शिवारातील विहिरीत टाकून दिला मात्र 27 मार्च रोजी विहिरीत अनोळखी मृतदेह असल्याची वार्ता सर्वदूर पसरली. दिवाणमळा पोलीस पाटील मिथुन गोविंद नागापुरे यांनी यादरम्यान मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली.

डोक्यावरील प्रहार व टॅटूने उलगडले खुनाचे गुपित
तब्बल 11 दिवस विहिरीत मृतदेह राहिल्याने कुजला होता व ओळख पटवणेही कठीण असल्याने पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाची पडताळणी केल्यानंतर त्यात मयताच्या डोक्याला जबर मार बसल्याची पुष्टी केली. मृताच्या छातीवर रवी तसेच हातावर राधा असे गोंदलेले असल्याने हातावरील टॅटूवरून मृताच्या वारसांचा शोध सुरू केल्यानंतर मयत हात दिवाणमाळचा रवी मालचे असल्याचे स्पष्ट झाले तर मृताचा भाऊ परमेश्वर यशवंत मालचे (सोनवणे), बहिण निर्मला आदींनी मृताची ओळख पटवली. पोलिस तपासात मृताचे गावातील राधाबाईशी अनैतिक संंबंध असल्याचे स्पष्ट होताच राधाबाईचा पती बापू निंबा मालचे यास ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 18 रोजी मयत नशेत असताना आरोपीने त्याच्या डोक्यात दगड घातला व घरी येत पत्नी राधाबाई व अल्पवयीन मुलाच्या मदतीने सायकलीवर मृतदेह टाकून तो विहिरीत फेकल्याची कबुली दिल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाणे निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील, मोहन पाटील, नितीन करंडे, हवालदार संदीप पाटील, हवालदार दरबारसिंग गिरासे, हवालदार सचिन गिरासे, कॉन्स्टेबल मयुर थोरात, कॉन्स्टेबल भगवान ढाकणे, कॉन्स्टेबल भूषण देवकाते आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !