दीपनगरात मॅनेजरला धमकावत दहा हजार लुटले : एकाविरोधात गुन्हा
Rs 10,000 Robbed in Deepnagar After Manager Threatened: Case Registered Against One Person भुसावळ (2 एप्रिल 2026) : दीपनगर प्रकल्पात एका कंपनीच्या मॅनेजरला जिवे ठार मारण्याची धमकी देत एकाने जबरदस्तीने दहा हजारांची रोकड हिसकावली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेश श्रीराम साबळे (52, दीपनगर) हे व्यवसायाने एका कंपनीचे मॅनेजर असून बुधवार, 1 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5.45 वाजता दीपनगर येथील इलेक्ट्रिक मेंटेनन्स कार्यालयासमोर संशयीत सम्राटकुमार सुरेश बनसोडे (रा.फेकरी, ता. भुसावळ) याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व संशयीताने फिर्यादीच्या खिशातून जबरदस्तीने 10 हजारांची रोकड लुटली. तक्रारदाराने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यावरून संशयीताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.








