भुसावळात पुन्हा धाडसी घरफोडी : 75 हजारांचा ऐवज लंपास
Another Audacious Burglary in Bhusawal : Valuables Worth ₹75,000 Stolen भुसावळ (2 एप्रिल 2026) : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम असल्याने नागरिक धास्तावले आहेत. शहरातील सिध्दिविनायक नगर, सायली लॉन्सच्या मागे बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत 75 हजारांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंद घराला टार्गेट
भुसावळातील सिध्दीविनायक नगरात पुनीत रामलालजी वर्मा (40) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. रविवार, 19 मार्च रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पुनीत वर्मा यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा शिताफीने तोडून घरात प्रवेश मिळवत 70 हजारांचे सोन्याचे मनी, दीड हजारांचे चांदीचे नाणी, तीन हजारांची रोकड मिळून 74 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी पुनीत वर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.








