धरणगावात चोरट्यांनी किराणा दुकानदाराचे घर फोडले : दोन लाखांचे दागिने लंपास


Thieves Burglarize Grocery Store Owner’s House in Dharangaon : Jewelry Worth Two Lakhs Stolen धरणगाव (2 एप्रिल 2026) : शहरातील किराणा दुकानदाराच्या बंद घरातून चोरट्यांनी एक लाख 96 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. या घरफोडीने खळबळ उडाली आहे.

घरफोडीमुळे उडाली खळबळ
धरणगाव शहरातील संजय नगरात राहणारे लक्ष्मण हिरामण चौधरी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. 23 मार्च रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडले. चोरट्यांनी दुकानातून 58 हजार 400 रुपयांचे पैजण, 33 हजारांचे चांदीचे जोडवे, एक लाख पाच हजारांचे दागिने असा एकूण एक लाख 96 हजार 400 रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना समोर आल्यानंतर लक्ष्मण चौधरी यांनी तातडीने धरणगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.




 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !