भरधाव डंपरच्या धडकेने चाळीसगाव तालुक्यातील तरुणी ठार


Young Woman from Chalisgaon Taluka Killed After Being Struck by Speeding Dumper चाळीसगाव (4 एप्रिल 2026) : चाळीसगाव-धुळे रोडवरील दसेगाव फाट्याजवळ भरधाव डंपरने रस्ता ओलांडणार्‍या दुचाकीला जबर धडक दिल्याने 20 वर्षीय तरुणी ठार झाली तर दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवार, 2 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजता घडला. अपघात प्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली.

चंचल नामदेव लांडगे (20, रा.रहिपुरी, ता.चाळीसगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे.



असा घडला अपघात
फिर्यादी वैष्णवी वैभव चौधरी (20, रा.चाळीसगाव) आणि तिची मैत्रीण चंचल नामदेव लांडगे (20, रा.रहिपुरी, ता.चाळीसगाव) या त्यांच्या सुझुकी क्सेस स्कुटीने (क्रमांक एमएच 52 ए 4391) रस्ता ओलांडत असताना चाळीसगावहून धुळ्याच्या दिशेने जाणार्‍या डंपरने (क्रमांक एम.एच.41 बी.के.9687) ने सिग्नल लाल असताना आणि समोर झेब्रा क्रॉसिंग असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत स्कुटीला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली.

डंपर चालकाला अटक
या भीषण धडकेत चंचल लांडगे हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला तर फिर्यादी वैष्णवी हिच्या डाव्या हाताला आणि पायाला गंभीर ईजा झाली. अपघातानंतर डंपर चालक बाळू नामदेव माळी (रा. नागापूर, ता.नांदगाव) याने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न देता किंवा पोलिसांना खबर न देता घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी चालक बाळू माळी याला रात्री 8.42 वाजता अटक केली आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !