धुळ्यातील देवपूर पोलिसांची कामगिरी : महागडे मोबाईल लांबवणार्या चोरट्यांना बेड्या
51 हजार रुपये किंमतीचे आठ मोबाईल जप्त : मोबाईल विक्रीपूर्वीच कारवाई
Devpur Police (Dhule) Achievement : Thieves Stealing Expensive Mobile Phones Arrested धुळे (4 एप्रिल 2026) : कुटूंब गाढ झोपेत असताना घराच्या छतावरून प्रवेश करीत चोरट्यांनी दोन कुटूंबाच्या घरातून 51 हजार रुपये किंमतीचे आठ मोबाईल तसेच आठ हजार सातशे रुपयांची रोकड लांबवली होती. 30 मार्च रोजी झालेल्या चोरीनंतर देवपूर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करीत स्थानिक दोन आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्याकडून आठ मोबाईल जप्त केले. तौसीफ उर्फ पापा भिकन तांबोळी (मास्तरवाडी, देवपूर, धुळे) व अंकित राजेंद्र शिरसाठ (22, गायकवाड चौक, जुने धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सराईत आरोपींना बेड्या
धुळ्यातील नगरपालिका कर्मचारी योगेध मधुकर करनकाळ (32, देवपूर धुळे) व सुनंदा सुधाकर वाघ (देवपूर, धुळे) यांच्या घरातून 30 रोजी मध्यरात्री चोरट्यांनी महागडे आठ मोबाईल लांबवले होते. गुन्हे शोध पथकाने 12 तासांच्या आत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकत महागडे मोबाईल जप्त केले.


यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस निरीक्षक समाधान वाघ, महिला उपनिरीक्षक कल्याणी पाटील, अंमलदार मिलिंद सोनवणे, हवालदार किरण मेहरुणकर, हवालदार कैलास पाटील, कॉन्स्टेबल भटेंद्र पाटील, कॉन्स्टेबल वसंत कोकणी, कॉन्स्टेबल सौरभ कुटे, कॉन्स्टेबल शुभम बोरसे आदींच्या पथकाने केली.





