मित्रासोबत आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार ; जनक्षोभानंतर पोलिसांनी आरोपींची नावे केली जाहीर


19-Year-Old Woman, Accompanied by a Friend, Gang-Raped; Police Release Names of Accused Following Public Outrage अमरावती (5 एप्रिल 2026) : मित्रासह भानखेडा फाटा परिसरात आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर पाच नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना अमरावती जिल्ह्याच्या चांदुर रेल्वे रोडवरील भानखेडा फाटा इथे घडली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असलीतरी नावे जाहीर न केल्याने जनक्षोभ वाढला व त्यानंतर पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केली.

काय घडले तरुणीसोबत ?
19 वर्षीय पीडित तरुणी आपल्या एका मित्रासह भानखेडा फाटा परिसरातून जात असताना पाच जणांनी दोघांना अडवलं. आरोपींनी पीडितेच्या मित्राला मारहाण करून त्याचे हातपाय बांधले व नंतर नराधमांनी पीडितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना 28 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी त्याच रात्री पाच आरोपींना अटकदेखील केली मात्र पोलिसांकडून आरोपींची नावं जाहीर केली जात नव्हती. यामुळे संतप्त नागरिक आणि विविध संघटनांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. अखेर घटनेच्या आठ दिवसानंतर पोलिसांनी या पाचही आरोपींची नावं जाहीर केली आहेत.


या आरोपींना अटक
पोलिसांच्या माहितीनुसार या घटनेत ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे (34), दीपक मरसकोल्हे (29), प्रमोद नारायण वाघाडे (39), शुभम उर्फ सोनू नारायण वाघाडे (28) आणि उमेश बेनीराम भोयर यांचा सहभाग असल्याने त्यांना अटक करण्यात आली तर शनिवारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !