अमळनेरजवळ अपघात : पिकअप उलटल्याने दहा जण जखमी


Accident Near Amalner : Ten Injured After Pickup Truck Overturns अमळनेर (6 एप्रिल 2026) : भरधाव पिकअप वाहन चालक ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना रस्त्यावर अचानक आलेल्या स्पीडब्रेकरचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटताच वाहन उलटले व या अपघातात दहा जण जखमी झाले.

हा अपघात अमळनेर तालुक्यातील जैतपीर गावाजवळ शुक्रवारी रात्री हा अपघात घडला. या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.


अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 3 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास या वाहनातून सुमारे 10 ते 15 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की, वाहन पलटी होताच त्यातील 10 ते 11 जण रस्त्यावर फेकल्याने अनेक प्रवाशांना दुखापती झाल्या.

जैतपीर मधील या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इतर जखमींवर स्थानिक स्तरावर उपचार सुरू आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !