मुक्ताईनगरात स्त्री जातीचे मृत अर्भक आढळले


Dead Female Infant Found in Muktainagar मुक्ताईनगर (6 एप्रिल 2026) : स्त्री जातीचे मृत अर्भक फेकून मातेने पलायन केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोर्‍हाळा परिसरात उघडकीस आली. अज्ञात व्यक्तीने स्वतःचे पाप लपवण्यासाठी किंवा अन्य कारणास्तव एका नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला शेतातील काटेरी झुडपात सोडून दिले. उघड्यावर टाकल्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात मातेचा शोध सुरू
मुक्ताईनगर तालुक्यात कोर्‍हाळा गावच्या शिवारातील वामन अमृत धाडे यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या काटेरी झुडपात एक नवजात स्त्री अर्भक मृतावस्थेत आढळले. हा प्रकार शनिवार, 4 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आला.


हवालदार श्रावण दशरथ भिल्ल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !