जळगावातील अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Hardened Two-Wheeler Thief from Jalgaon Nabbed by MIDC Police जळगाव (7 एप्रिल 2026) : दुचाकी चोरीनंतर अवघ्या 12 तासात आरोपीला जळगाव एम.आय.डी.सी.अटक केली. साहिल महोमद तडवी (28, रा.मच्छीबाजार, तांबापुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

12 तासात दुचाकी चोरटा जाळ्यात
जळगावातील अरुण सखाराम अहिरे (38, रा. तांबापुरा) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, 3 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांनी आपली ‘हिरो होंडा स्प्लेंडर’ (एम.एच.एच.28 जी.3256) ही घरासमोर हँडल लॉक करून लावली मात्र, दुसर्‍या दिवशी शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांना आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही व गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी तांबापुरा भागातील साहिल तडवीला ताब्यात घेताच त्याने चोरी केलेली दुचाकी काढून दिली.


यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक धनके, नितीन ठाकूर, किरण पाटील, राहुल घेटे यांच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !