भुसावळ बसस्थानकाचे आजपासून दोन दिवस स्थलांतर

बस डेपोतून सुटणार बसेस : सुदैवाने टळला भाडेवाढीचा भूर्दंड


Bhusawal Bus Stand Relocated for Two Days, Starting Today भुसावळ (13 एप्रिल 2026) : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जयंतीचा उत्साह पाहता बसस्थानकाचे तीन रविवार ते सोमवारदरम्यान बस आगारात स्थलांतर करण्यात आले आहे. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर रेल्वे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. सुदैवाने बदल करताना भाडेवाढीचा भुर्दंड मात्र टळल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

बसस्थानक हलवले डेपोत
महामानवाच्या जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी उभारलेले ऑनर्स, स्वागत कमानी आणि विद्युत रोषणाईमुळे शहराच्या मुख्य भागात गदी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने रविवारी सकाळपासूनच बसस्थानक डेपोमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी बस स्मानकात एकही बस नसल्याने संपूर्ण आवार रिकामे होते व संधी साधून अवैध वाहतूकदारांची चांगलीच चांदी झालेली दिसून आली.

बसेसच्या फेर्‍या डेपोतून
भुसावळ स्थानकातून सुटणार्‍या बसेस तसेच बाहेर गावातून येणार्‍या बसेस आता भुसावळ बस डेपोतून सुटत आहेत. यात शालेय फेर्‍यांसह लांब पल्ल्याच्या बसेसचा समावेश आहे. 24 तास राहणार्‍या या वाहतुकीचा भार आता हायवेवर आल्याने महामार्गावर बसेसची कर्दळ वाढली आहे.

बुधवारी मुळ ठिकाणाहून होणार वाहतूक
रविवारपासून सुरू झालेले हे तात्पुरते स्थलांतर मंगळवार रात्रीपर्यंत कायम राहील. बुधवारी सकाळी पुन्हा एकदा सर्व बसेस मध्यवर्ती बसस्थानकातून नियमित वेळापत्रकानुसार धावतील, असे सूत्रांनी सांगितले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !